Sunday, June 5, 2011

बहुगुणी अभ्यंगस्नान

 

दिवाळीतील अभ्यंगस्नानाला अतिशय महत्त्व आहे. तेल चोळून, उटणे लावून भल्या पहाटे अभ्यंगस्नान होते. या स्नानामुळे त्वचेबरोबरच मनालाही तजेला मिळतो.
अभ्यंग उपचार आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सांगितला आहे; पण त्याचा प्रसार मात्र सध्या परदेशात होत आहे. अंगाला तेल रगडणे, याला नाव दिलंय “मसाज’. उटण्याच्या खरखरीतपणाने त्वचा खसखसून धुणे, याला म्हणतात “स्क्रब’ आणि अंग कोरडे पुसून उटी लावणे, याला ते म्हणतात “डस्टिंग’.
मसाजचे विविध प्रकार आहेत. त्यात नुसताच विशिष्ट भाग चेपणे, चापट्या, थोपटल्याप्रमाणे स्ट्रोक देणे हे विशिष्ट प्रकार काही तक्रारी दूर करायला चांगले असतात. यापेक्षा वेगळे म्हणजे जिरेपर्यंत सर्वांगाला तेल चोळून लावणे, ही झाली “अभ्यंग स्नेहल चिकित्सा’.
अभ्यग्डे मार्दवकरः
कफवातनिरोधनः ।
धातूनां पुष्टिजननो
मृजावर्ण बलप्रदः ।।
  आयुर्वेद म्हणते, सर्वांगाला तेलाने  मालिश केल्याने शरीर       बळकट होते व त्वचा नितळ व निरोगी राहते. सकाळी  आंघोळीपूर्वी अर्धा तास अंगाला तेल चोळून लावावे. त्वचेची रंध्रे उतरत्या कौलासारखी वरून खाली झुकणाऱ्या दिशेने असतात. त्यामुळे तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावे, हे त्यासाठीच म्हटले आहे. संपूर्ण शरीराला लावायला 2 मोठे चमचे (अंदाजे 30 मिली.) तेल पुरते. संपूर्ण शरीराला तेल लावून जिरवायला 15 ते 20 मिनिटे पुरतात. नंतर तेवढाच वेळ थांबून आंघोळ करायला हरकत नाही. पोटाची तक्रार असताना किंवा आजारपणात अभ्यंग करू नये.
आपल्या त्वचेचे तीन भाग असतात. बाह्य त्वचा म्हणजे आपल्याला दिसणारी. ती तुकतुकीत, लवचिक व उजळ असावी. बाह्य त्वचेवर सतत मृतपेशी व मृतत्वचेचा लेप चढत असतो. मालिशमुळे तो निघतो. रंध्रे मोकळी होतात व तेथील श्‍वासोच्छवास चालू राहतो. त्या आतील भागात असतात महत्त्वाच्या ग्रंथी. जसे घाम पाझरणाऱ्या, तेल पाझरणाऱ्या, संवेदना पोचवणारे मज्जातंतू. मसाजने येथील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायूचा व पोषक तत्त्वांचा पुरवठा होतो. निरुपयोगी तत्त्वे बाहेर फेकली जातात. त्या आतील भागात असतो मेदाचा थर. ज्यावर त्वचा विसावली असते. तेल मेदाच्या थरात शिरून तेथील शिथिलता घालवून तो कार्यक्षम व लवचिक बनवते. त्यामुळे त्वचा निबर व निस्तेज दिसत नाही.
कृशानां बृहणाय स्थूलानां ।कर्शनाय च तैलमेव अलम ।।
म्हणजे कृष शरीर पुष्ट होण्याकरिता व स्थूल शरीर कृष होण्याकरिता तेल हे एकच पुरेसे आहे. हे आयुर्वेदात म्हणूनच म्हटले असेल.
परदेशात मसाज पार्लर्स असतात. तेथे सगळे शरीर रगडून देतात. त्यामुळे ताणतणाव नष्ट होऊन नवचैतन्य येते, असे म्हणतात. आपल्याकडेही बाळ-बाळंतिणीला, पैलवानांना गेलेली शक्ती भरून निघण्यासाठी मसाज करण्याची पद्धत आहे. आपल्याला काही दररोज अभ्यंगाला वेळ नसतो हे खरे आहे. रात्री झोपताना निदान डोक्‍याला व तळपायाला तरी तेल चोळून लावावे. त्याने थोडे तरी फायदे मिळतात. आठवड्यातून एकदा तरी सर्वांगाला अभ्यंग करावे.
निरनिराळ्या तेलबियांपासून त्या त्या गुणाची तेले मिळतात. जसे एरंड, करंज, कडुलिंब अशी अळाद्य, तर शेंगदाणा, बदाम, ऑलिव्ह, खोबरेल, तीळ अशी खाद्य तेले; पण अभ्यंगाला तिळाचे तेल उत्तम. खरंतर तेल नावच त्यावरून आले “तिलोद्‌भवं तेलम’ म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले हे तेल. आयुर्वेदाला तिळाच्या तेलाचे कौतुक फार. स्वाभाविकच आहे म्हणा. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते. चोळून लावताना उष्णता व घर्षणामुळे ते त्वचेत शिरते शरीरात सर्वत्र पोचून नंतर पचते व ताण शिथिल करते. शरीरातील घटकांना वंगण पुरवते.
तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे, तिचे गुण आत्मसात करते. अशी वनस्पती हवी. जी तीळ तेलाचे गुण वाढवेल, दोष कमी करेल व त्वचेला फायदे देईल. खरं तर तेल हे नाव त्यावरूनच आले. “”तिलोद्‌भव तैलम” म्हणजे तिळापासून उत्पन्न झालेले ते तेल; पण हल्ली तेलातील भेसळ हा प्रकार सर्रास झालाय. ती रोखावी म्हणून भारत सरकारने “ऍगमार्क’ ही प्रणाली आणली. ऍगमार्कला भारत सरकारची दर्जा व “शुद्धतेची हमी’ असे म्हणतात. तिळाचे तेल घेताना त्यावरील ऍगमार्क चिन्हे पाहूनच घ्यावे.
खाद्य तेलाची भेसळ, टंचाई व महागाई यावर उपाय म्हणून केरळमध्ये “करंजेल’ या अखाद्य तेलात वात लावून दीपोत्सव साजरा करतात. बरे, करंज तेल जंतूनाशकही आहे. त्यामुळे वातावरणही शुद्ध राहते.
उद्वर्तनं कफहरं मेदोघ्नं शुक्रदं परम ।
बल्यं शोणित कृच्चापि
त्वकप्रसाद मृदुत्वकृत ।।
उटण्यामुळे जास्तीची चरबी नाहिशी होते. त्वचेचा वर्ण व पोत सुधारतो. उटणे म्हणजे साफ करणाऱ्या, पोषण करणाऱ्या व सुगंधी वनौषधींचे वस्त्रगाळ चूर्ण. आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी ते दुधात किंवा पाण्यात कालवून त्वचेला चोळून लावावे. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आर्द्रताही निघून जाते, तर उटण्यामुळे ती राखली जाते.
दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमोजोबलप्रदम ।
कण्डूमलश्रमस्वेदतन्द्रा तृड्‌दाहपाप्ननुत ।।
स्नान हे आरोग्यदायी आहे. खाज, मळ, घाम इ. पातकांचा ते नाश करते.
शरीराचे तापमान व आंघोळीसाठी घेतल्या जाणाऱ्या पाण्याचे तापमान सारखे असावे. म्हणून अतिथंड किंवा अतिउष्ण पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. आंघोळीनंतर स्वच्छ, कोरड्या टॉवेलने अंग खसखसून पुसावे. त्वचेच्या आरोग्यासाठी अशी ही अभ्यंग चिकीत्सा. अगदी दररोज शक्‍य नसल्यास आठवड्यातून एकदा तरी करावी. 




फरक कुठे पडला आहे..........

 

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|

नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|

ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|

पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|

बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|

मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|
पावसात ओलावा हा जास्त च..
आई च्या हातची भाजी..
डोकं पुसणारी आई..
छत्री घेवून येणारे बाबा.. बरोबर कि नाही...

ते दिवस किती छान वाटतात ....

ते दिवस किती छान वाटतात ....
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....

कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला

भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???

त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे

आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...

बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये

जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात

१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...

आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????......

बाबा काठी टाकून द्या

काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी शिवाजीनगरहून कात्रजला निघालो होतो. लाल महालाजवळील चौकात सिग्नलला थांबलो होतो. एक सत्तरीचे गृहस्थ माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ” बाळ , मला पुढच्या चुकत सोडशील का ? ” मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”
” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “
” बाबा, मला कात्रजला जायचं. “
” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “
“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “
” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.
सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?
मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन  कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.
पण………….
कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.
का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?
बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते.  का ?
सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.
त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?
यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!
बाबा, father

बैल आणि मी

मागे एकदा मी न्यायालयाने ‘ बैलगाडा शर्यती ’ वर घातलेल्या बंदीचा निषेध नोंदवताना “ बैलगाडा शर्यत ” हा लेख लिहिला होता. तेव्हा मी बैलाच आणि शेतकऱ्याच नातं किती जिव्हाळ्याच असतं यावर लिहिण्याच नक्की केलं होतं.
मी इंजिनीअरींगला असतानाची गोष्ट. आम्हाला शेती कामासाठी एक बैल कमी पडत होता म्हणून आम्ही एक नवा बैल विकत आणायचं ठरवलं. चुलत्यांसोबत मी काश्तीच्या जनावरांच्या बाजारात गेलो. तिथून आम्ही चांगला उंचापुरा, खिल्लारी जातीचा बैल विकत घेतला. त्याची शिंगही लांबलचक आणि अणकुचीदार. माझा  तेव्हाचं वय विशीच. त्याचं नाव मी राजा ठेवलं.
गावाकडची जनावर शेतकऱ्यांच्या सहवासात वावरणारी. नेहमी धोतर, सादर आणि पागोटं पाहणारी. त्यांना शहरी पेहरावाची प्यांट शर्टची सवय नसते. सहाजिकच ते  शहरी माणसाला जवळ फिरकू देत नाहीत.
पण राजानं मला स्विकारलं. त्याला वैरण टाकणे, पाणी पाजणे, पेंड घालणे, हि काम मीच करायचो. त्याला नांगराला, औताला, बैलगाडीला जुंपण्याच कामही मलाच कराव लागायचं.
त्याचं आणि माझ एवढ मेतकुट जमलं कि तो माझ्य्शिवाई कुणालाही हात लावू देईना. अगदी माझ्या चुलत्यांनाही. माझे चुलते त्याला वैरण घालायला गेले कि त्याने  शिंग उगरलच म्हणून समजावं. पण माझ्या त्याच्यात कुठलं नातं निर्माण झालं होतं कुणास ठाऊक. मी मात्र त्याच्या अवती भवती बिनधास्त वावरायचो .
आमच्याकडे संध्याकाळी बैलांना गव्हाची कणीक खाऊ घालायची परंपरा होती. पण राजाला कणीक खाऊ घालायचं कामही मलाच करावं लागायचं. मीही अगदी पोटच्या  मुलाला आईनं भरवाव तसं त्याला भरवायचो. त्याच्या पुढ्यात बसायचो. कणकेचे बारीक मुठीएवढे गोळे करायचो. आणि अगदी त्याच्या मुखात घास द्यायचो. त्याच्या रखरखीत जिभेचा स्पर्श मला अगदी मोरपिसासारखा वाटायचा.
मी तसा शहरातच लहानाचा मोठा झालेलो. गावाशी माझं नातं सुट्टी पुरतंच. शाळा असो अथवा सुट्टी असो पण आईचा ओरडून घसा बसेपर्यंत मी काही अंथरुणातून   बाहेर निघायचं नाव घेत नसायचो. आणि रात्री एकदा अंथरुणात झोकून दिल्यानंतर सकाळी सूर्य चांगला हातभार वरती येई पर्येंत उठायचो नाही. हि सगळी झोप अगदी गाढ असायची. इतकी कि कुंभकर्णानही आम्हाला लवून मुजरा करावा.
पण इथं राजाच्या सहवासात माझ्या झोपेतला गाढपणा कुठं हरवला कुणास ठाऊक.  गावाकडे मला राजाची काळजी असायची. माझ्या चुलत्यांना आम्ही आण्णा म्हणायचो. त्यांना राजा जवळपासही फिरकू द्यायचा नाही. मग त्याला रात्री दोन वाजता, पहाटे पाच वाजता वैरण टाकण्याचं काम कोण करणार ? सहाजिकच राजासाठी रात्री अपरात्री उठण्याची वेळही माझ्यावरच आली. इतके दिवस अखंड गाढ झोपेची सवय. पण इथं राजासाठी मी ठरल्यावेळी न चुकता उठायचो. कोणीही आवाज दयावा लागायचा नाही. पण जाग आल्यावर घड्याळात पाहिलं तर बरोबर रात्रीचे दोन किवा पहाटेचे पाच वाजलेले असायचे.
आठ महिन्यात मला नौकरी मिळाली आणि मी पुन्हा पुण्यात परतलो. राजाला कुणास ठाऊक, कशी पण भनक लागली होती. त्याचे डोळे भरून आलेले होते. त्याच्यातला उत्साह मावळला होता. पुढ्यातली वैरण दातातही धरत नव्हता.
माझी अवस्थाही त्याच्यासारखीच झालेली. त्याची आणि माझी भेट मी पुन्हा मोठ्या सुट्टीवर आल्यावरच होणार होती. मी त्याला जड अंतकरणानं वैरण आणि पाणी करीत होतो. निघायच्या आदल्या दिवशी त्याला तेलात माळून कणीक खाऊ घालायला गेलो पण पठ्ठ्यानं एक घास शिवला नाही. त्या रात्री मीही जेवलो नाही.
दुसऱ्या दिवशी मी पहाटेच निघलो, कुणास ठाऊक कसं पण मी दूर निघाल्याच त्याला कळलं होतं. मी घराबाहेर पाउल टाकताच तो गोठ्यात चटदिशी उभा राहिला. दावणीला जोर देऊ लागला. त्याची तडफड बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मनात कालवाकालव झाली. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गळ्यात पडून मुसमुसून रडलो. पाय निघत नव्हता तरी निघालो. शहरात आलो नौकरीत रमलो एक यंत्र झालो. बर्याच महिन्यानंतर गावाकडे आलो.  पहातोय तर राजा दावणीला नाही.
आण्णांना विचारलं तर म्हणाले,” आरं, तू गेलास आणि बाईलीच कुणालाच हात लावू दिईना. वैरण आमी लांबूनच घालयचो, आणि पाणी सुदिक लांबूनच दावायचो. पण दावणीतून सोडून कामाला जुपायाची काय आमची हिम्मत हुईना. आखरी त्याच्या मूळ मालकाला सांगावा धाडला. घेतल्या कि मतीला दोन हजार रुपय खोत खावून दिवून टाकला.”त्यानंतर कितीतरी वर्ष सुट्टीला गावी गेलो कि राजाच्या रिकाम्या दावणीकड मी पहायचो आणि त्याच्या माझ्यातलं एक नातं माझ्या मनात गजबजून यायचं.
 
Quantcast

Monday, May 23, 2011

प्‍लीज गॉड.गिव्‍ह मी अ ब्रेक,किंवा देवा,उचल रे बाब‍ा, असे उदगार ब-याच जणांच्‍या तोंडून आपण अनेकदा ऐकतो, सगळं काही अगदी रूळावरून धावणा-या रेल्‍वेप्रमाणे सुरळीत चालू असतं. पण का कुणास ठाऊक जगण्‍याचाच कंटाळा यायला लागतो. मनात अनेक प्रश्‍नांची उत्‍तरे....
. पैसाच हवा पण कशाला, पैसे कमवायचे तर धावावच लागतं. पण पैसा पैसा करताना जगणं हातातून सुटत चाललंय, त्‍यांचं काय करायचं,''पैसा वाईट आहे'' असं म्‍हणणंच मुळात चूक. आपण आपली तत्‍वच चुकीच्‍या जागी ठेवता आणि तत्‍वापेक्षा पैसा श्रेष्‍ठ मानता . याला जबाबबदार आहे सतत होणारं ब्रेन वॉशिंग.      सतत एकच मारा आल्‍यावर होतो, ''पैसा हवाच'', खूप धनदौलत असायला हवी, तिचा उपभोग घ्‍यायला हवा. ''बुई वॉंट मोअर'' पण कशासाठी याचाच विचार आपण करत नाही.
      खरं तर माणासांना हवी असते माणुसकी,  पण आपण माणसं जोडण्‍यापेक्षा वस्‍तूचे पर्याय शोधत बसतो.  पण या वस्‍तू आपल्‍यावर प्रेम करू शकत नाहीत.  कितीही संपत्‍ती गोळा केली तरी आपल्‍या पाठीवर प्रेमाची थाप मारण्‍यासाठी माणसंच लागतात. आपल्‍याला काय हवं आणि आपली नेमकी गरज काय यातलं कन्‍फयुजनच सगळया असमाधानकारकतेचं कारण आहे. भूक लागल्‍यावर जेवायचं सोडून दुसरा काय खात आहे याकडे आपले लक्ष जास्‍त. मग एकामागून ऐक अशा गरजा वाढतच जातात. दिल्‍याने वाढतं असं म्‍हणतात .मग कुणाला पैसे देण्‍याऐवजी वेळ द्या आणि पहा, खरंच तुमच्‍यासाठी त्‍यांचं प्रेम,  त्‍याची आपुलकी वाढेल...
          आजूबाजूंच्‍या माणासांना, त्‍यांच्‍या प्रश्‍नांना वेळ द्या. असं काही तरी करा जे तुमच्‍या जगण्‍याला एक अर्थ देईल. केवळ पैसा पाहून माणसं जोडलीतर मित्रच काय सच्‍चे शत्रूदेखील मिळणार नाहीत.
 आपण भावनेच्‍या भरात वाहून जातो. खूप भावूक होऊन निर्णय घेतो. काम कराताना अपयशची भीती, जगताना सतत होणा-या यातनांचं दुःख काय करायचं या सगळयाचं ''डिटॅच युवरसेल्‍फ'' हे साधं, सोपं तंत्र वापरलं तर या भावनाच आपल्‍यातला ओलावा जागा ठेवतात. सुखकारक भावना हव्‍यात आणि वेदनांच्‍या झळा नको असं शक्‍य नाही. जे काय जगायचं, अनुभवायचं ते पुरेपूर अनुभवा.
            वेळ हातातून निसटणा-या वाळूसारखा चाललाय, दिवस सरतायत, असेच वर्षेही संपतील पण जगायचं राहून गेलं तर करयचं काय, आयुष्‍य नावाची गोष्‍ट जगायला इतकी भयंकर आहे असं आपापल्‍या जीवन संघर्षाचे (स्‍ट्रगल) वर्णन करून आपण नेहमी सांगत आसतो. पण ज्‍यावेळी आपण मोठे होतो त्‍यावेळी आपण अधिक शिकतो हेच आपण विसरून जातो. आयुष्‍यभर आपण आहेत तेवढेच राहीलो. तर आपली अक्‍कलही तेवढीच राहील. वय वाढणं म्‍हणजे स्‍वताःला घडवत समृध्‍द होणं. मरणाच्‍या जवळ जाणं नसून जगायला शिकणं हो.
  आपण आहेत तेवढेच राहावं असं आल्‍याला वाटतं. त्‍याचं कारण म्‍हणजे असमाधान, अपुरेपण रोजच्‍या जगण्‍यातला अर्थच मुळात आपल्‍याला समजत नाही, अर्थपूर्ण जगता येत नाही. सतत वाटतं काही तरी करायचं राहिलं. म्‍हणून काळाच्‍या मांग जाऊन ते करावसं वाटंत. त्‍यापेक्षा सतत काही तरी करायची उर्मी, जिदद असेल तर पुढे जाण्‍यात रस वाढतो. मग काळ, वेळ यांच्‍याशी संबंधच उरत नाही. काही करायंचे नाही आणि सतत रडत राहायचं, सतत आपला वेळ वाया जाईल का याबददल तळमळत राहून वेळ जाणं थांबत नाही. म्‍हणून हे करायचं राहीलं किंवा ते करायला वेळच मिळाला नाही असं म्‍हणून नका. ते तातडीने करायला घ्‍या.
          नियम फक्‍त मोडू नका- नवीन नियम तयारही कराः समाजाचे सगळेच नियम मो्डीत काढण्‍यात कोणतंही शहाणपण नाही. असं करून आपण कोणतीही क्रांती घडवत नाही.
खरं तर समाज, संस्‍कृतीच्‍या छोटय छोटया गोष्‍टी आपण पाळायला हव्‍यात. मात्र मोठया गोष्‍टींची सूत्रे आपण आपल्‍याच हातात, ठेवायला हवीत. म्‍हणजे आपण कसा विचार करतो, आपण आपल्‍या जगण्‍यासाठी काय तत्‍व म्‍हणून स्‍वीकरतो हे आपण ठरवायला हवं. ते आल्‍यासाठी समाजाने ठरवणं मुळीच मान्‍य करू नये. आपल्‍या जगण्‍याची पध्‍दत आणि त्‍यातून आकार घेणारं कल्‍चर आपणच घडवायला हवं. ते समृध्‍द करायचं तर आपण तसंच जगायला हवं. कोणी तरी आपल्‍यासाठी जगून ते कल्‍चर जन्‍माला घालणार नाही. त्‍यासाठी आपण विचारांची शिस्‍त पाळून, चुकत असेल तर तेळीच सुधारणा करून स्‍वताःची जीवन पध्‍दती स्‍वतःच घडवायला हवी..

Saturday, April 30, 2011

 
 

'वसंत'गीत!


लोकल ट्रेनचा खडखडाट, मोटारींच्या हॉर्नचा कलकलाट, गल्ली-बोळातल्या लाऊडस्पीकर्सचा गोंगाट या मानवनिर्मित आवाजांबरोबरच कावळ्यांचे कर्णकर्कश्श काव काव, कुत्र्यांचे वैयक्तिक आणि सामुदायिक भुंकणे आणि रात्री-अपरात्री झाडांच्या माथ्यावर लटकणा-या वटवाघुळांचे भीतीदायक किंचाळणे इतकेच काय ते आवाज मुंबई-पुण्यासारख्या शहरांतल्या जनतेच्या नशिबी असतात. पण चार दिवसांपूर्वीच मुंबईत चक्क कोकिळाचे कूजन कानी पडले आणि वसंत ऋतूच्या आगमनाची अकस्मात चाहूल लागली. ही जाणीव खरेच आनंददायी होती. ऋतूंचा राजा असलेल्या वसंताचे उद्या अधिकृतपणे आगमन होत आहे. हा वसंत सर्वांना सुखकर होवो आणि सर्वांच्याच आयुष्यात आशांची आणि स्वप्नांची नवी टवटवीत पालवी घेऊन येवो, हीच इच्छा! कारण आज भारतीयांना खरेच नव्या आशांना अंकुर फुटलेले पाहण्याची नितांत मानसिक गरज आहे.
निसर्गाने आपले ऋतुचक्र मानवी व सृष्टीच्या गरजांनुसार तयार केले आहे. शिशिरातील पानगळीमुळे झाडे शुष्क झालेली. सुकलेल्या फांद्या आणि मातीच्या रस्त्यांवरून उठणा-या धुळीच्या लोटांमुळे सारे जीवनच जणु सुकू लागलेले. मार्गस्थांना अंमळभर पहुडण्यासाठी रस्त्याच्या कडेला झाडांची सावली नाही आणि प्राण्यांना पोटाची भूक भागवण्यासाठी हिरवा पाला नाही. पक्ष्यांना रात्री निजण्यासाठी झाडांवर पानांची छपरे नाहीत आणि थंडीचे झांेबरे वारे अडवण्यासाठी वृक्षराजीची कुंपणेही नाहीत. सारे जीवन जणू संपले, या भीतीची जाणीव होत असतानाच हवेतला गारवा कमी व्हायला लागतो. सुकल्यामुळे करड्या होऊ लागलेल्या फांद्या-डहाळ्यांमधला हिरवा जीवंतपणा पुन्हा जागा होऊ लागतो; त्या डहाळ्यांना अलगद कोंेभ फुटू लागतात आणि पिवळी, हिरवी पाने हळूच डोळे किलकिले करत जगाकडे पाहू लागतात. बघता बघता झाडे पालवीने बहरून जातात. तिथे गुलमोहर फुलायला लागतो. लाल पलाशाला लालबुंद फुलांचे झुपके येतात. त्यांच्या पानांत लपलेले कोकिळ कुहू कुहू करत प्रणयाराधन करायला लागतात. वातावरणाला आनंदाच्या झुळुका प्रफुल्लित करतात. वसंत जीवनाला भारून टाकतो. पुन्हा आश्वस्त करतो. जीवनाचा प्रवास नव्या जोमाने पुढे चालू होतो. आता पुढे आग ओकत येणारा ग्रीष्म, त्यानंतरचा वर्षा, नंतरचा शरद, हेमंत आणि नंतर पुन्हा अवतरणारा शिशिर यांना तोंड देण्यास सृष्टी सज्ज होते. पण ते व्हायचे, तर त्यासाठी शिशिरानंतरच्या वसंताची गरज असतेच. हाच जीवनदाता वसंत पुन्हा एकदा आला आहे, त्याचे स्वागत करूया!
गेल्या काही महिन्यांत भारतीय समाजजीवन शिशिराच्या मोठ्या कोपाला तोंड देत आहे. सर्वच क्षेत्रांत कडक्याची थंडी जाणवू लागली आणि आशांची केवळ पानगळच होत असल्याचे दिसू लागले की, वाटते की, सारे काही संपले! सकाळीच क्षितिजावर पांघरलेल्या धुक्याच्या जाड चादरीमुळे सूर्याचे दर्शन तो वर येईपर्यंत होतच नाही आणि संध्याकाळीही तो क्षीण प्रकृतीच्या मजुरासारखा लवकरच पश्चिमेच्या क्षितिजावरून घरी निघून जातो. मग असते केवळ अंधाराचेच राज्य. अशा काळोख्या रात्री ऐकू येते केवळ रातकिड्यांची किर्रकिर्र, घुबडांचे चित्कार आणि दूरवर लांडग्यांचे आवाज. काळ्या आकाशातल्या चांदण्याही भयानक वाटायला लागतात आणि पातळ होत जाणा-या चंद्रकोरीच्या प्रकाशात दिसणारी स्वत:ची सावलीही 'शत्रू' वाटू लागते. वाटतं सारं काही आता आटोपलं. पायात प��ढे जाण्याचे त्राण नाहीत आणि मागे वळायचीही भीती. अशा अवस्थेतून समाज जात असतो, तेव्हा सारे काही विपरितच घडू लागते किंवा जे काही घडतंय, ते सारंच आपल्याला संपवण्यासाठी अशी भावना निर्माण होते. अशा गर्भगळीत अवस्थेत माणसे आपले भान विसरतात आणि रस्ताही चुकतात. काही अचानक रस्ता सोडून कडेच्या झुडुपांत शिरतात आणि तिथे दबा धरून बसलेल्या तरसाची शिकार बनतात, तर काही रस्त्यातच थिजतात आणि संर्पदंशाने मरतात. काही माघारी वळतात आणि पळू लागतात. रस्ता संपत नाही, पाय मात्र थकतात आणि गलितगात्र होऊन ते तिथेच कोसळतात. पाठलागाच्या भयाने पळणारे मांजर एका क्षणी अखेर थांबते, मागे वळते आणि पाठलाग करणा-याच्या नरड्यावरच झेप घेते, तसे काहीजण हिंसक बनतात. ते दगडफेक, हिंसाचार करू लागतात; हातात कुणा ना कुणाचे झेंडे नाचवू लागतात आणि त्वेषाने बेभान होऊन अखेर पोलिसांच्या वा विरुद्ध गटाच्या गोळ्यांचे शिकार बनतात. थोडक्यात सारेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे सर्वनाशच ओढवून घेतात. अशा निराशेच्या रात्री खूप मोठ्या वाटतात आणि आशेचे दिवस लहान लहान होताना दिसतात.
भारतीय समाज अशाच काळोख्या बोगद्यातून प्रवास करत असताना वसंत आला आहे. त्याच्या मंद प्रकाशाची तिरीप लांबून दिसत आहे. ती क्षीण आहे. मात्र दिवस मोठा होऊ लागला आहे, ही जाणीवही मनाला उभारी आणणारी आहे. दिवस मोठा झाला की, रात्र आपसूकच लहान होणार. मानवतेचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाच्या राज्यात जाणारा, अज्ञानापासून ज्ञानाकडे नेणारा आणि असत्यापासून सत्यापर्यंत पोहोचवणारा आहे, अशी आपली श्रद्धा असल्याने या बदलाकडे नेणारा वसंत हा तर नव्या जीवनाचा दूतच. तोच आतापर्यंत जीवनात असलेली मरगळ आणि निराशेचे सावट दूर करेल, अशी श्रद्धा आहे. तशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
जीवनातील पानगळ अनेक रूपांत येते. जेव्हा मनात रुजलेल्या प्रतिमांचा अचानक भंग होतो, त्या प्रतिमा आरशाच्या काचेसारख्या खळकन फुटतात, ज्यांना देव मानले, त्यांच्यातला दानव क्रूर वाकुल्या करून भेडसावू लागतो, जेव्हा बुद्धीच्या राज्याची हद्द संपते, तेव्हा मनातली पानगळ सुरू होते. एकेक पान गळायला लागते आणि मनोवृक्ष निष्पर्ण होऊन उघडा-बोडका दिसायला लागतो. बोचऱ्या थंडीमुळे अंग कोरडे पडते. वाढती महागाई आणि नाक्यानाक्यावर भर दिवसा लुटमार करणारा सार्वजनिक क्षेत्रातला भ्रष्टाचारसुद्धा त्वचेवरची स्निग्धता अशीच हिरावून घेतो आणि अंग शुष्क, कोरडे बनवतो. थंडीने त्वचा कोरडी झाली, तर तेल लावून, क्रीम वापरून ओलावा आणता येतो, पण महागाई आणि भ्रष्टाचाराचे काय? तिथे तर परिस्थिती अशी की, ज्यांनी या रोगांवर इलाज करायचा, तीच मंडळी स्वत:चे खिसे ओले करण्यासाठी रोग कसा वाढेल, याची काळजी करताना दिसतात. अशा वेळी सामान्यांनी काय करायचे? भ्रष्टाचार केला म्हणून ज्यांना कंेद सरकारातून बाहेर पडावे लागले, असे उच्चविद्याविभूषित आणि परराष्ट्रनीतीतील जाणकार माजी मंत्री क्रिकेटच्या सामन्यांत पहिल्या रांगांत आपल्या मैत्रीण-कम-तृतीय पत्नीबरोबर राजरोसपणे कॅमे-याला स्माइल देताना दिसतात. अशा निर्लज्ज जगात सामान्यांना स्वत:च्याच जिण्याची शरम वाटायला लागते, त्याला काय करणार? सरकार वाचवण्यासाठी खासदार 'विकत' घेतल्याचे आरोप झाले, तर त्याबद्दल खंत व्यक्त करण्याऐवजी आम्हाला जनतेने पुन्हा निवडून दिले, अशी शेखी राज्यकतेर्च मिरवतात. अशा वेळी सामान्य जनतेचे व्यथा आणि दु:खांचे कढत अश्रू कोणाला दिसणार? त्याचे विव्हळणे केवळ अरण्यरुदनच ठरते. ते कोणाच्या कानी पडणार?
तर शिशिराची पानगळ अशी जबरदस्त आहे. तरीही 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल', या कुसुमाग्रजांच्या आशावादात आपणही आपला सूर मिसळवायला हवा. सुरेश भटांनी अशाच एका काळोख्या रात्री लिहिले, '...आम्ही जीवंत राहू। आम्ही उद्याचे चंद, सूर्य वाहू'. तीच वेळ आली आहे. वसंताच्या उष:काळात उद्या जागे होताना सूर्य, चंद आपण वाहून न्यायचे आहेत, याची जाणीव असू द्या! त्यासाठी उद्या वर्ष प्रतिपदेला वसंताचे स्वागत करूया! त्याचेच गीत गाऊया!