Sunday, September 26, 2010

द खान अकादमी : जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुली शाळा

भारतीय आई अन बांगलादेशी वडिलांचे सुपुत्र असलेले अमेरिकास्थित श्री खान हे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी वेबसाईट च्या माध्यमातून खुली शाळा चालवतात. आजवर २ लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. पूर्वाश्रमीचे सिलीकोना व्हेली मध्ये नोकरी करणारे श्री खान ह्यांनी २००४ ला हा प्रयोग सुरु केला. आता ३० विषयांवर (उदा. Maths, Biology, Chemistry, Physics and Economics. Lessons in Mathematics cover Algebra, Arithmetic, Geometry, Trigonometry, Statistics and Calculus. ) शेकडो व्हिडीओ च्या माध्यमातून ते ज्ञान प्रसाराचे काम करीत आहेत.
श्री खान स्वत: इलेक्ट्रिक इंजिनीअर आहेत. त्यांनी अमेरिकेतून इलेक्ट्रिक आणि संगणक विषयात पदवी अन पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी एम.बी.ए. केले आहे. बिल गेटस आणि त्यांच्या मुलांनी देखील हा प्रयोग अनुभवला आहे.
ज्यांचेकडे संगणक आणि इंटरनेट सुविधा आहे अश्या सर्वांनी http://www.khanacademy.org/ या वेबसाईट वर जाऊन व्हिडीओ शिक्षणाचा लाभ घ्यावा. या सामाजिक उपक्रमाला अमेरिकेतील अनेक दानशूर व्यक्ती अन गुगल कंपनीने आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले आहे.
खेडोपाडी ज्ञान प्रसाराचे काम करणार्या या आधुनिक भगीरथाला आमचा मानाचा मुजरा!!!
इंडियन एक्सप्रेस ह्या दैनिकातील सविस्तर वृत्त:http://www.indianexpress.com/news/he-teaches-30-subjects-to-2-lakh-students-virtually/688154/1

No comments:

Post a Comment