घरोघरी मातीच्या चुली’ या वास्तवावर आता बहुतांश दृष्टीने फुली मारावी लागेल. छोटय़ा गावात, शेतवस्तीवर चुलीचे अस्तित्व अजून टिकून आहे. पण एक काळ असा होता, की ही चूलबाई प्रत्येक घरात विविध रूपांनी आणि आकारांनी विराजमान असे. त्याची जुन्या काळातील तीन रूपे सर्वानाच माहीत असतात. स्वयंपाकघरात विराजमान असते ती चूल. तिची जोडी जमते ‘वईल’ या पुरुषाबरोबर. ती चूल तो वईल. चूलबाई स्त्रीलिंगी असून स्वयंपाकघरात प्रथम मानाची. सप्तपदीत स्त्री पुढे पुरुष मागे. पण हा पुरुष मनातल्या मनात वेगळीच शपथ घेत असतो. ‘बाईऽग, आज चाल तू पुढे. पण उभं आयुष्य माझ्या मागं मागं यायचंय’ आता दिवस बदलतोय! पण पूर्ण बदलेल का? त्यामुळे जडसृष्टीत तरी चूलबाईचा हा मान मला कायमच सुखावतो. स्वयंपाकघरात ‘चूल आणि वईल’ असा दोन जोडय़ा असत. त्यातील एक चूलबाई आणि वईल वापरला जाई. आदल्या दिवशी पेटवलेली चूल दुसऱ्या दिवशी लाल मातीने सारवली जाई आणि लख्ख सारवलेली चूलबाई स्वयंपाक रांधायला सिद्ध होई. चूल आणि वईल मध्ये पोकळ जागेने जोडलेले असे. चूलबाई पेटली की वईलही जरा मंद लाल निळसर ज्वाळांनी धगधगून उठे. या चुलीवर सतत एक तांब्याचे तपेले असे. ते पाण्याने भरलेले असे. रात्री १२ लाही गरम पाणी तयार. हे तांब्याचे तपेले सतत चुलीवर असे. स्वयंपाक झाला, की झाले हे स्थानापन्न. चूलबाई कामात असे तेव्हा हे ‘वईल’वर विसावे. सततच्या काजळीनं हे काळंकुट्ट झालेलं. त्याला नावच होतं. ‘मशेरकं’.
या चुलीच्या पण परी असत. चूलवईल स्वयंपाकघरात मानाची. चुलीपेक्षा मोठा चुला. तो पडवीत बसे. पोहे भाजायला, भाजणी करायला, लाडवाचे भाजायला, जिलेबी काढण्यासाठी उपयोगी पडे. जिलेबी काढायची म्हटली तर याच चुल्यावर मोठ्ठी पिवळी परात विराजमान व्हायची आणि आमच्या चंपूताई जोशी त्याच्यावर तुपात भराभर जिलब्या टाकीत. साजूक तुपात पोहणाऱ्या त्या जिलेब्या आम्ही पडवीतल्या पायठणीवर बसून न्याहाळत राहायचो. त्यामुळे हा पडवीतला चुला पेटला की आम्ही भावंडे खूश व्हायचो. या चुल्याचे वडील म्हणजे चुलाण. हे चांगले भक्कम असे. जांभ्या दगडाचे तीन दगड ठेवून हे चुलाण तयार होई. हे चुलाण म्हणजे अंघोळीचे पाणी तापवण्यात तरबेज. या चुलाणात वाडीतले माडाचे थरपे, लाकडाच्या मोठय़ा गाठी आणि ओंडके, वाडीतल्या झावळय़ा काहीही जळण म्हणून चाले. पडवीलगत अंगणात एका बाजूला हे चुलाण असे. वर पत्र्याचे छप्पर. बाकी चारी दिशा मोकळय़ा. या जागेला एक खास नाव असे ‘थाळ’. आजी म्हणे, ‘जा, थाळीवरचे गरम पाणी आण, लोण्याची रवी धुवायला.’
आता या चूल कुटुंबाला खायला लागणारे अन्न म्हणजे सरपण. घरातील चूल प्रथम पेटवायची ती गोवरीने किंवा शेणीने. घरात गाईगुरे भरपूर असत. त्यामुळे वाडीत गोवऱ्या थापण्याचा उद्योग सतत असे. आई किंवा आजी रात्री गोवऱ्यांनी शेगडी भरीत. ती खापराची असे. तिच्या बुडाशी पाच-सात गोवऱ्या. वर साळीची फोलपटे भरली जायची. रात्री झोपताना चुलीतला छोटा निखारा त्या साळीच्या तुसावर ठेवला की झाले! सकाळी जिवंत अग्नी लगेच मिळे. ‘जिवंत’ हा कोकणचाच शब्द. ही शेगडी घरातला अग्नी सतत सांभाळी. एवढंच तिचं काम. रांधायला तिचा कधीच उपयोग नसे. सकाळी चूल या शेगडीनेच पेटे. स्वयंपाकघरातील चूलबाईला जडजड लाकडे झेपायची नाहीत. तिच्यासाठी छोटी लाकडे असायची. शहरात त्याला ‘बंबफोड’ म्हणत. आमचा शब्द ‘मोठी सळपे’. लहान सळपे म्हणजे अत्यंत पातळ बोटाएवढय़ा ढलप्या. प्रथम चूल पेटताना त्याचा उपयोग होई. पडवीतला चुला, जरा जादा भक्षक. तो माडाच्या झावळय़ांचे काखे, पोया पिचुंदप्या, जरा लांब लाकडे खाई. स्वयंपाकघरातील ‘चूल’ सतत ‘वईल’बरोबर असे. तोही तिला मदत करी. चूलबाईवर भाताला कढ आला, की तो ‘वईल’कडे सरके. भाताचे तपेले वईलावर विसावले की मंद जाळाने भात मऊसूद, मोकळा छान होई.
‘चूल’, ‘चुला’ आणि ‘चुलाण’ यांना घरात नारायणाचे रूप होते. अग्निनारायण! दिवाळी झाली की आजी घरातील हरचंदला सांगायची, ‘जा बाबा, उद्या नामा कुंभार येणारेय चुली थापायला. डोंगरातून दोन टोपल्या लाल चिकण माती आण’. ही माती जरा चिकट असे. लालभडक असे. दुसऱ्या दिवशी सकाळी नामा येई. मागच्या अंगणात चुली घाली. चूलवईलांच्या दोन जोडय़ा, एक मोठा चुला. एखादी शेजारची आजी येऊन आजीला सांगे. ‘गोऽ सीता, मला पण एक चुला दे बाई. तो नाम्या एका चुल्यासाठी कुठला येतोय?’
नामाच्या मागे माझी आणि बहिणीची भुणभुण होई. ‘आम्हाला भातुकलीची चूल घालून दे.’ तो आनंदाने सार करी. सुटीत भातुकलीच्या या चुलीत नैवद्याच्या वाटीचा भात आम्ही शिजवीत असू. त्यासाठी एक छोटं आजोबांच्या मुठीएवढं तांब्याचं तपेलं आजीने गोपा तांबटाकडून करून घेतलं होतं. या चुली वाळायला चार महिने जात. पावसाच्या आधी स्वयंपाकघरातल्या जुन्या चुली काढल्या जात आणि चूलवईलाच्या दोन जोडय़ा तिथे स्थानापन्न होत. नवी चूल प्रथम पेटवताना आई तिच्यावर हळदीकुंकू वाहात असे. फुले घालून साखरेचा नैवेद्य झाला की मगच चूलबाई स्वयंपाकाला सिद्ध होई. ‘घरात चूल पेटलीच पाहिजे’ याचा अर्थ बाळपणी कळत नसे. वाडीवरची रखमा कधीतरी थरथरत्या पायांनी आजीपुढे फाटका पदर पसरी. ‘सीतामाय, दोन दिस जाले. चूल नाय पेटली.’
आजी घरात जाई. शेरभर तांदूळ आणि भांडंभर डाळ तिला देई. आज या आठवणी झाल्या, की मनात व्याकुळता दाटते. कोकणचे दारिद्रय़ आजही थोडंबहुत तसंच आहे. हे केव्हा सुधारणार?
आम्हा भावंडांसाठी चूल गमतीचा भाग होता. दुपारी चूल विझली, की आम्ही फणसाच्या आठळय़ा, पावटय़ाच्या शेंगा, बाळवांगी, छोटे बटाटे त्यात सारून ठेवायचो. मंद मेमुरात (धगधगती राख) हे सारं खरपूस भाजून निघे. मंद निखारे असतच थोडे.
चूल, चुला आणि चुलाण यांच्यावरची एक गंमत सांगायला हवी. तिला ‘मी नाव दिलंय ‘खाचणचूल’. कोकणात पूर्वी कार्यालये नव्हती. आजही नाहीत. लग्न घरी होत. मोठं गोत जमे. अशा वेळी मागच्या अंगणात एक फूट रुंद आणि पाच-सहा फूट रुंद असा जमिनीत चर खणला जाई. या चरावर मोठी, सतेली, पातेली राहतील अशा पद्धतीने जांभे दगड मांडीत. अशा एका जमिनीतील चरावर तीन मोठय़ा चुली तयार होत. परत या खाचणचुलीला लाकडे समोरून घालावी लागत नाहीत. दोन्ही बाजूंनी चर मोकळा असतो. त्यात मोठमोठे लाकडाचे ओंडके छान जळत. वर फक्त पत्र्याचे छप्पर असे. अंगणाच्या चारी बाजू मोकळय़ा. मोकळय़ा वाऱ्याने अग्नी रसरसून छान पेटे. तीनचारशे माणसांचा स्वयंपाक स्त्रिया चार-पाच तासांत सहज करीत. मोठी सतेली, पातेली चुलीवर उतरायला पुरुषमंडळी मदत करत. भल्यामोठय़ा कढईच्या कानामध्ये आडवा बांबू घालून कढईबाई खाली उतरे.
अंगणात पंक्ती बसत. शेजारचे घर सलगीचे असे. मधला गडगा काढून दोन अंगणे एकत्र होऊन मोठा हॉलच तयार होई. माडाच्या झावळय़ांनी शाकारलेले आणि शेणाने मऊसूद सारवलेले हे अंगण छान दिसे. मांडवाला पताका, आंब्याचे डहाळे. केळीचे लोंगर, आंब्याचे शेंदरी घड, तांबूस रामफळे, शहाळी असे नैसर्गिक सुशोभन असे. तयार झालेले अन्न पुरुष ओटीवर आणून ठेवीत. केळीची पाने आणि हिरवेगार केळीचेच द्रोण.
पानांभोवती गुलाल, रांगोळी, उदबत्त्यांचा वास घमघमे आणि ही पंजी असलेली खाचणचूल सर्वाचे पोट तृप्त करी. आता घरी कोकणात चूल नाही. तरीही एक चूल मनात जागी आहे. आई किंवा आजी पुढे बसलेली. भराभर भाकरी करणारी. भाकऱ्यांची चळत चुलीला टेकून उभी आणि झणझणीत पिठलं आणि कांदा-वांग्याच्या भरिताची घमघम. हे चित्र माझ्या मनात कायमच जागे आहे.
Friday, September 16, 2011
Saturday, September 3, 2011
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात !!
आज घरोघरी गौरी बसतील. दोन दिवस माहेरपणाला आलेल्या गौरीचं कोण कोडकौतुक होईल. माहेरवाशिणीचं कौतुक करण्याची आपली परंपरा तशी जुनीच... पण आता या संकल्पनेतच बदल होत चाललाय... लेकीच्या माहेरासाठी सासुरवास भोगणारी आई ते आता लेकीच्या घरी दुरावलेलं माहेरपण अनुभवणारी आई... हे कौतुकास्पद स्थित्यंतर सध्या आजूबाजूला घडत ..
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
आयुष्यात जेव्हा 'सासर' येतं, तेव्हाच 'माहेर' कळतं, असं म्हणतात. माहेरच्या वाटेकडे ते डोळे लावून बसणं... वर्षातून एकदा येणाऱ्या सणासाठी माहेराहून येणाऱ्या भावाची वाट पाहणं... अंगणातल्या पक्ष्याला नाहीतर वाऱ्यालाच माहेरचा निरोप धाडायला लावणं... माहेराची ही ओढ जात्याच्या घरघरीतून, रोजच्या कामाच्या रहाटगाड्यातून अनेक 'लेकीं'च्या मुखातून अलगद बाहेर पडली. बहिणाबाईंनी माहेराच्या वाटेचं किती चपखल वर्णन केलंय,
लागे पायाला चटके
रस्ता तापीसानी लाल
माझ्या माहेरची वाट
मला वाटते मखमल
पूर्वी नुकतंच लग्न झालेल्या मुलीने ज्येष्ठात सासरी राहू नये, असं मानलं जायचं. त्यामुुळे लेकीच्या त्या पहिल्या माहेरपणाचं कौतुकही खूप असायचं. लाडाकोडात वाढलेली पोर सुखात नांदतेय ना, हे उंबऱ्यापाशी असलेल्या मायेला त्या पोरीच्या डोळ्यांत पाहून लगेच कळायचं. पुढे भाद्रपद महिन्यात गौराईसोबत माहेरपणाला आलेली लेक हक्काचं माहेरपण अनुभवे.
माहेरी जाईन बैसेन गादीवरी
विसावा तुझ्या घरी मायबाई
असं ती लेक उगाच म्हणायची नाही ! सासरची कामं , सासूबाईंचे टोमणे ,सासऱ्यांची कडक शिस्त , दीर - नणंदेचे हट्ट ... या साऱ्या साऱ्यांतूनकाही दिवसांपुरती का होईना सुटका तिची व्हायची . अर्थात मायेच्याउबदार ओलाव्याची आसही त्यात दडलेली असे . लग्नाला दोन - तीन वर्षंहोईपर्यंत ही तहान भागायची तरी ! पण एकदा का मूलबाळ झालं , आणिसंसाराच्या रहाटगाड्याला ' तिची ' सवय झाली की त्यातून माहेरासाठी वेळमिळणं तसं कठीणच होऊन बसायचं . गौरीगणपतीच्या वेळी आईशी होणारंहितगुज , तिच्याशी केलेल्या सुखदु : खाच्या गप्पा सारं सारं कुठेतरीहिरमुसून जायचं . भोगाव्या लागणाऱ्या सासुरवासाचं दु : ख माहेरच्या त्याउंबऱ्यापलीकडे कधी पोहोचलंच नाही ... आणि कधी चुकूनमाकून लेकीने तेधाडस दाखवलंच तर ' बयो , आता तेच तुझं घर ', असा समजावणीचासूरही ऐकावा लागे . आमच्या पोरीचं नशीबच फुटकं , असं म्हणून आईबापगप्प बसत ... आणि त्या ' लेकी ' साठी माहेर नावापुरतंच उरे . मुलीलाकुठे दुखलं खुपलं तरी बैचेन होणारे आईबाप अशा वेळी मात्र कच खात .त्या वेळी धाडसाने पाऊल उचलणारं ' माहेर ' तेव्हा विरळंच !
पण हळुहळू का होईना , लेकीवरच्या अन्यायाची धग माहेरपर्यंत पोहोचलीआणि ते लेकीच्या पाठीशी समर्थपणे उभं राहिलं . हुंड्यासाठीचा छळ असोकी नवऱ्याचं ' लफडं ' की नवरा गेल्यानंतर तुटलेलं घर ... पाठीशी खंबीरराहिलेल्या माहेरानेच तिला लढण्याचं बळ दिलं ... आणि माहेरचं महत्त्वनव्याने त्या लेकीला उमगलं .
एकीकडे माहेरचं हे ' बळ ' तिची शक्ती ठरत असताना या ' बळा ' चाअतिरेकही पहायला मिळाला . केवळ आनंद आणि दु : खद प्रसंगातमाहेरच्यांकडून मिळणाऱ्या ' मदतीच्या हाता ' चं रुपांतर नको त्या 'हस्तक्षेपा ' त झालं . घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुनेच्या माहेरच्यामाणसांच्या होणाऱ्या लुडबुडीमुळे सासरच्या घरात क्लेश निर्माण होणं ,घटस्फोटांपर्यंत मजल जाण्याची उदाहरणही पहायला मिळाली .
आताही लग्न झालेल्या मुलींचं माहेर मोबाइल फोनमुळे खूप जवळ आलंय. अमुक पदार्थाची रेसिपीच नव्हे तर घरात घडणारी प्रत्येक गोष्ट ' डेली सोप' प्रमाणे दररोज सांगणाऱ्या लेकीही इथे आहेत . तर काहीजणींनी सासरआणि माहेर या दोघांनाही सोयीस्कर अंतरावर ठेवलंय ... आता शक्यतोनवरा - बायको दोघेही कमवते असतात . त्यामुळे साधारणत : लग्नझाल्यानंतर दोघांचाही कल स्वतंत्र राहण्याकडे असतो . दोघांनी मिळूनकाढलेल्या कर्जातून उभं राहिलेलं घर खऱ्या अर्थाने त्या ' दोघांचं ' बनलेलंअसतं . त्यामुळे जिथे सासरच रहात नाही , तिथे माहेर उरलं कुठे ?म्हणूनच त्या घरात जसे मुलाचे आई - वडील हक्काने राहतात , त्याचघरात लेकीच्या आई - बाबांनाही यायला काहीच वावगं वाटत नाही . आधीमुलीच्या घरी पाळणा हलेपर्यंत पाणीही न पिणारे आईबाबा आता हक्काने 'हवापालटा ' साठी लेकीकडे येत आहेत .
अर्थात हे केवळ हवापालटापर्यंतच मर्यादीत नाही . लेकीच्या घरी स्वत : चंमाहेरपण मोठ्या प्रेमाने अनुभवण्याचं स्तुत्य स्थित्यंतर सध्या पहायलामिळतंय . एकतर लेक मोठी होऊन सासरी जाईपर्यंत त्या आईचं स्वत : चंमाहेर तुटलेलं असतं . त्या आईचे आई - वडील निवर्तले असतात किंवाअसले तरी त्या घरी भावांचे संसार फुललेले असतात . मग पतीचं घर हेचआपलं घर मानण्याशिवाय गत्यंतर नसतं . पतीची साथ नसेल तर हे जीवनअधिकच कष्टप्रद बनतं . मुलांच्या संसारात कधी मन रमतं तर कधी नाही. तर सुनेशी पटेलच याची खात्रीही नसते . मन हलकं करावसं वाटतं असतं, सुखदु : खाचं हितगुज करावसं वाटतं , अशा वेळी पोटची पोर , हाचएकमेव आधार वाटत असतो आणि तिचं घर तिला स्वत : चं वाटतं .
केवळ एकुलती एक मुलगी असणारी आईच नव्हे तर कर्तीसवरती मुलेअसूनही आईने मुलीच्या घरी राहण्याकडे सध्या कल वाढू लागलाय . हीलेकही आईचे स्वागत तितक्याच अगत्याने करतेय . एव्हाना मूलझाल्यानंतर ' आई ' च्या भूमिकेतून जाणाऱ्या लेकीलाही आईचे मोलनव्याने जाणवू लागलेलं असतं . घरात कोणीतरी मायेचं मोठं माणूस हवंही भूकही असते . त्यामुळे आईच्या रुपात लेकीला मायेची ऊब मिळतेच ,पण त्या आईलाही लेकीच्या मायेचा ओलावा अनुभवायला मिळतोय .अर्थात हे सर्व असं सुरळीत होण्यात महत्त्वाचा वाटा जावयांचाही आहे . 'जशी माझी आई , तशीच तुझी आई ', असं समजून उमजून याजावयांनीही या आईंची जबाबदारी स्वीकारलीय . त्यांना घरातलं एक सदस्यबनविण्यात , त्यांना हवं नको ते विचारण्यात ते लेकीपेक्षा जराही कमीपडत नाहीत , हेही लक्षात घेतलेलं बरं !
बहिणाबाई म्हणतात , ' लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते '. सासरीकितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या , कितीही सासूरवास भोगावालागला तरी आपल्या लेकीला सासरी गेल्यानंतर हक्काचं माहेर मिळावं ,यासाठी तिची ' माय ' आजन्म सासूरवास भोगत असते . पण आता याच 'आई ' चं सुटलेलं माहेरपण तिला परत मिळावं , यासाठी हीच लेक आतासासरी नांदतेय ... ' आईच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते ' ही नवीनउक्तीच जणू जन्माला आली आहे .

Subscribe to:
Posts (Atom)