Saturday, September 3, 2011

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात !!

आज घरोघरी गौरी बसतील. दोन दिवस माहेरपणाला आलेल्या गौरीचं कोण कोडकौतुक होईल. माहेरवाशिणीचं कौतुक करण्याची आपली परंपरा तशी जुनीच... पण आता या संकल्पनेतच बदल होत चाललाय... लेकीच्या माहेरासाठी सासुरवास भोगणारी आई ते आता लेकीच्या घरी दुरावलेलं माहेरपण अनुभवणारी आई... हे कौतुकास्पद स्थित्यंतर सध्या आजूबाजूला घडत ..
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात 
माहेरी जा सुवासाची कर बरसात 
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात 
आई भाऊसाठी परी मन खंतावतं 
विसरली का गं भादव्यात वर्स झालं 
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
 
 
आयुष्यात जेव्हा 'सासर' येतं, तेव्हाच 'माहेर' कळतं, असं म्हणतात. माहेरच्या वाटेकडे ते डोळे लावून बसणं... वर्षातून एकदा येणाऱ्या सणासाठी माहेराहून येणाऱ्या भावाची वाट पाहणं... अंगणातल्या पक्ष्याला नाहीतर वाऱ्यालाच माहेरचा निरोप धाडायला लावणं... माहेराची ही ओढ जात्याच्या घरघरीतून, रोजच्या कामाच्या रहाटगाड्यातून अनेक 'लेकीं'च्या मुखातून अलगद बाहेर पडली. बहिणाबाईंनी माहेराच्या वाटेचं किती चपखल वर्णन केलंय, 

लागे पायाला चटके 
रस्ता तापीसानी लाल 
माझ्या माहेरची वाट 
मला वाटते मखमल 

पूर्वी नुकतंच लग्न झालेल्या मुलीने ज्येष्ठात सासरी राहू नये, असं मानलं जायचं. त्यामुुळे लेकीच्या त्या पहिल्या माहेरपणाचं कौतुकही खूप असायचं. लाडाकोडात वाढलेली पोर सुखात नांदतेय ना, हे उंबऱ्यापाशी असलेल्या मायेला त्या पोरीच्या डोळ्यांत पाहून लगेच कळायचं. पुढे भाद्रपद महिन्यात गौराईसोबत माहेरपणाला आलेली लेक हक्काचं माहेरपण अनुभवे. 

माहेरी जाईन बैसेन गादीवरी 
विसावा तुझ्या घरी मायबाई 
असं ती लेक उगाच म्हणायची नाही सासरची कामं सासूबाईंचे टोमणे ,सासऱ्यांची कडक शिस्त दीर नणंदेचे हट्ट ... या साऱ्या साऱ्यांतूनकाही दिवसांपुरती का होईना सुटका तिची व्हायची अर्थात मायेच्याउबदार ओलाव्याची आसही त्यात दडलेली असे लग्नाला दोन तीन वर्षंहोईपर्यंत ही तहान भागायची तरी पण एकदा का मूलबाळ झालं आणिसंसाराच्या रहाटगाड्याला तिची सवय झाली की त्यातून माहेरासाठी वेळमिळणं तसं कठीणच होऊन बसायचं गौरीगणपतीच्या वेळी आईशी होणारंहितगुज तिच्याशी केलेल्या सुखदु खाच्या गप्पा सारं सारं कुठेतरीहिरमुसून जायचं भोगाव्या लागणाऱ्या सासुरवासाचं दु ख माहेरच्या त्याउंबऱ्यापलीकडे कधी पोहोचलंच नाही ... आणि कधी चुकूनमाकून लेकीने तेधाडस दाखवलंच तर बयो आता तेच तुझं घर ', असा समजावणीचासूरही ऐकावा लागे आमच्या पोरीचं नशीबच फुटकं असं म्हणून आईबापगप्प बसत ... आणि त्या लेकी साठी माहेर नावापुरतंच उरे मुलीलाकुठे दुखलं खुपलं तरी बैचेन होणारे आईबाप अशा वेळी मात्र कच खात .त्या वेळी धाडसाने पाऊल उचलणारं माहेर तेव्हा विरळंच 

पण हळुहळू का होईना लेकीवरच्या अन्यायाची धग माहेरपर्यंत पोहोचलीआणि ते लेकीच्या पाठीशी समर्थपणे उभं राहिलं हुंड्यासाठीचा छळ असोकी नवऱ्याचं लफडं की नवरा गेल्यानंतर तुटलेलं घर ... पाठीशी खंबीरराहिलेल्या माहेरानेच तिला लढण्याचं बळ दिलं ... आणि माहेरचं महत्त्वनव्याने त्या लेकीला उमगलं 

एकीकडे माहेरचं हे बळ तिची शक्ती ठरत असताना या बळा चाअतिरेकही पहायला मिळाला केवळ आनंद आणि दु खद प्रसंगातमाहेरच्यांकडून मिळणाऱ्या मदतीच्या हाता चं रुपांतर नको त्या 'हस्तक्षेपा त झालं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुनेच्या माहेरच्यामाणसांच्या होणाऱ्या लुडबुडीमुळे सासरच्या घरात क्लेश निर्माण होणं ,घटस्फोटांपर्यंत मजल जाण्याची उदाहरणही पहायला मिळाली 

आताही लग्न झालेल्या मुलींचं माहेर मोबाइल फोनमुळे खूप जवळ आलंयअमुक पदार्थाची रेसिपीच नव्हे तर घरात घडणारी प्रत्येक गोष्ट डेली सोपप्रमाणे दररोज सांगणाऱ्या लेकीही इथे आहेत तर काहीजणींनी सासरआणि माहेर या दोघांनाही सोयीस्कर अंतरावर ठेवलंय ... आता शक्यतोनवरा बायको दोघेही कमवते असतात त्यामुळे साधारणत लग्नझाल्यानंतर दोघांचाही कल स्वतंत्र राहण्याकडे असतो दोघांनी मिळूनकाढलेल्या कर्जातून उभं राहिलेलं घर खऱ्या अर्थाने त्या दोघांचं बनलेलंअसतं त्यामुळे जिथे सासरच रहात नाही तिथे माहेर उरलं कुठे ?म्हणूनच त्या घरात जसे मुलाचे आई वडील हक्काने राहतात त्याचघरात लेकीच्या आई बाबांनाही यायला काहीच वावगं वाटत नाही आधीमुलीच्या घरी पाळणा हलेपर्यंत पाणीही न पिणारे आईबाबा आता हक्काने 'हवापालटा साठी लेकीकडे येत आहेत 

अर्थात हे केवळ हवापालटापर्यंतच मर्यादीत नाही लेकीच्या घरी स्वत चंमाहेरपण मोठ्या प्रेमाने अनुभवण्याचं स्तुत्य स्थित्यंतर सध्या पहायलामिळतंय एकतर लेक मोठी होऊन सासरी जाईपर्यंत त्या आईचं स्वत चंमाहेर तुटलेलं असतं त्या आईचे आई वडील निवर्तले असतात किंवाअसले तरी त्या घरी भावांचे संसार फुललेले असतात मग पतीचं घर हेचआपलं घर मानण्याशिवाय गत्यंतर नसतं पतीची साथ नसेल तर हे जीवनअधिकच कष्टप्रद बनतं मुलांच्या संसारात कधी मन रमतं तर कधी नाहीतर सुनेशी पटेलच याची खात्रीही नसते मन हलकं करावसं वाटतं असतंसुखदु खाचं हितगुज करावसं वाटतं अशा वेळी पोटची पोर हाचएकमेव आधार वाटत असतो आणि तिचं घर तिला स्वत चं वाटतं 

केवळ एकुलती एक मुलगी असणारी आईच नव्हे तर कर्तीसवरती मुलेअसूनही आईने मुलीच्या घरी राहण्याकडे सध्या कल वाढू लागलाय हीलेकही आईचे स्वागत तितक्याच अगत्याने करतेय एव्हाना मूलझाल्यानंतर आई च्या भूमिकेतून जाणाऱ्या लेकीलाही आईचे मोलनव्याने जाणवू लागलेलं असतं घरात कोणीतरी मायेचं मोठं माणूस हवंही भूकही असते त्यामुळे आईच्या रुपात लेकीला मायेची ऊब मिळतेच ,पण त्या आईलाही लेकीच्या मायेचा ओलावा अनुभवायला मिळतोय .अर्थात हे सर्व असं सुरळीत होण्यात महत्त्वाचा वाटा जावयांचाही आहे . 'जशी माझी आई तशीच तुझी आई ', असं समजून उमजून याजावयांनीही या आईंची जबाबदारी स्वीकारलीय त्यांना घरातलं एक सदस्यबनविण्यात त्यांना हवं नको ते विचारण्यात ते लेकीपेक्षा जराही कमीपडत नाहीत हेही लक्षात घेतलेलं बरं 

बहिणाबाई म्हणतात , ' लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते '. सासरीकितीही हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या कितीही सासूरवास भोगावालागला तरी आपल्या लेकीला सासरी गेल्यानंतर हक्काचं माहेर मिळावं ,यासाठी तिची माय आजन्म सासूरवास भोगत असते पण आता याच 'आई चं सुटलेलं माहेरपण तिला परत मिळावं यासाठी हीच लेक आतासासरी नांदतेय ... ' आईच्या माहेरासाठी लेक सासरी नांदते ही नवीनउक्तीच जणू जन्माला आली आहे 

No comments:

Post a Comment