कमालीचा गारवा, पानावरील दव हिरवी गार झाडी आणि चहाची गोड चव गाईचा तो हंबरडा आणि पाखरांची किलबिल नदीच्या पाण्यावरील मोत्यांची ती झिलमिल म्हशींच्या धारा आणि बांधावरची दळणवळण वसुदेवाचा हरीनाम संगे फटका आणि गवळण आंघोळीची लगबग आणि चुलीचा तो वास कौलारू घर आणि अंगणी शेणाची आरास रस्त्यांवरली धूळ आणि फोडणीचा आवाज ती देवाची आंघोळ आणि तो चंदनाचा सुवास टपोऱ्या पानाची तुळस आणि अंगणातला तो प्राजक्तसडा उगवता सूर्य आणि डोंगराच्या त्या सुवर्णकडा गेले ते दिवस गावचे आता फक्त आठवण गोड गोड त्या क्षणांची मनी फक्त साठवण |
No comments:
Post a Comment