काही दिवसांपूर्वीची घटना आहे. मी शिवाजीनगरहून कात्रजला निघालो होतो. लाल महालाजवळील चौकात सिग्नलला थांबलो होतो. एक सत्तरीचे गृहस्थ माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, ” बाळ , मला पुढच्या चुकत सोडशील का ? ” मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
बाबांचं वय सत्तरीच. अंगात जुने मळकट कपडे. त्यावर कोट. पायात जुनाट वहाणा. डोक्यावर शेठी टोपी. सिग्नल सुरु झाला. मी बाबांना घेऊन निघालो. सिग्नलमागून सिग्नल जात राहिले. मी बाबांशी थोड्या बहुत गप्पा मारल्या. बाबा इंग्रजीचे उत्तम व्यासंगी. माझ्यासारख्या पोस्ट ग्र्याजुएत तरुणाला लाज वाटावी असं इंग्लिश बोलत होते. मला त्यांच्याविषयी आदर वाटला. ‘ त्यांचं ठिकाण आलं कि बाबा सांगतीलच.’ म्हणून मी गाडी चालवत राहिलो. चौकामागून चौक गेले. पण बाबा काही कुठं उतरायचं ते सांगेनात. स्वारगेटच्या सिग्नलला गाडी थांबली. तेव्हा मीच म्हणालो, ” बाबा, तुम्हाला कुठ जायचं ?”
” तू कुठवर जाणार आहेस बाळ ? “
” बाबा, मला कात्रजला जायचं. “
” मग असं कर. मला इथच सोड. मला डाव्या बाजूला जायचं. “
“मी सोडू का तुम्हाला तुमच्या घरापर्यंत ? “
” नको बाळ. जवळच आलंय माझं घर. जाईन मी चालत. थ्यन्क्स. ” म्हणत बाबा उतरले. डाव्या बाजूच्या गर्दीत दिसेनासे झाले.
सिग्नल सुटला म्हणून मीही निघालो. पण डोक्यात प्रश्नाचं मोहळ उठलं होतं.
ज्या बाबांना पुढच्या चौकात उतरायचं होतं ते बाबा इथवर का आले ? मुला असतील न त्यांना ? मग त्यांनी पैसे दिले नसतील का ? कि मुलं पहातच नसतील बाबांना ?
मी मागे पुण्यातल्या निवारा या वृद्धाश्रमात मी माझ्या कवितांचा कार्यक्रम सदर केला होता. त्यात आपल्याला कविता सदर करायची संधी मिळावी यापेक्षा मुलांविना खऱ्या अर्थानं पोरक्या झालेल्या आई बाबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण आणावेत एवढाच हेतू होता. सगळेच अगदी मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम ऐकत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधान आणि कौतुक दिसत होतं. काही स्त्रियांनी माझी आया – माया घेऊन कडकडून बोटं मोडली. सगळ्यांसोबत काही वेळ गप्पा मारल्या. तेव्हा कळलं इथ यायची कुणालाच हौस नव्हती.
पण………….
कुणाची मुलं अमेरिकेला होती…………
कुणाच्या मुलांना आई बाबांकडे पहायला वेळ नव्हता………..
कुणी त्यांच्या आजारपणाला कंटाळल होतं……….
कुणाला पैसे गेले तरी चालतील पण हि अडगळ घरात नको होती………..
पण असं असूनही कुणाच्याही बोलण्यात आपल्या मुलांविषयी कटुता नाही जाणवली.
का होतं असं ? आई बाबांना आपली जाणीव असते. त्यांची माया असते आपल्यावर. मग आपल्याच मायेला ओहोटी का लागते ? त्यांनी भरवलेल्या चिऊकाऊच्या घासाचा विसर कसा पडतो आपल्याला ? कसे विसरतो आपण त्यांनी आधाराला दिलेलं बोट ? आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी काय काय केलंय याचा विसर कसा पडतो आपल्याला ?
बरयाच घरात सासू सुनेचं पटत नाही हि वस्तुस्थिती असते. का ?
सून असो कि मुलगा जेव्हा जेव्हा तुम्हाला घरातल्या वठलेल्या वृक्षावर चिडण्याची रागवण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या लहानपणी किती कष्ट खाल्ल्यात याचं स्मरण करावं.
त्यांनी जे केलं त्याला आपण ‘ कर्तव्य ‘ असं नाव देणार असुत तर मग आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर का पडावा ?
यापेक्षा अधिक काय सांगू !!!!!!
No comments:
Post a Comment